बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील- संजय राऊत

मुंबई | सद्याच्या परिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारणविरहीत काम केलं तरच हा देश वाचेल. अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय समिती स्थापन करावी. या समितीच्या माध्यमातूनच कोरोनाची परिस्थिती हाताळली जावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती मानून निर्णय घेण्याची मागणी राऊतांनी केली आहे. अनेक राज्यांमधील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सर्वोच्च न्यायालयानं अनेक गोष्टींवरून केंद्र सरकारला फटकारलं आहे. हे आधीच व्हायला पाहिजे होतं. महाराष्ट्राला कोरोना लसींचा म्हणावा तसा पुरवठा केंद्राकडून होत नाही. त्यामुळं अनेक लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ ओढावल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फक्त फटकारून काय साध्य होणार? अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय स्तरावर एक समिती स्थापन करायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार या राष्ट्रीय समितीच्या माध्यमातून कोरोना परिस्थिती हाताळतील. जेणेकरून कुठल्याही राज्यावर अन्याय होणार नाही. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि लसींच्या पुरवठ्यावर केंद्र सरकारनं योग्य नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र लसीचा पुरवठा नसल्यामुळं राज्यातील लसीकरण लांबणीवर पडलं आहे.

थोडक्यात बातम्या

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी जॉन अब्राहम आला धावून; उचललं हे मोठं पाऊल!

चंद्रपूर हळहळला! अवघ्या 35 वर्षीय डाॅक्टराचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट, तरुणानं शेअर केला धक्कादायक अनुभव

प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनानं निधन!

कोरोनाने उद्धवस्त केला नवदाम्पत्याचा संसार; अवघ्या तीन दिवसात नवरदेवाला कोरोनाने गाठलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More