Top News देश

गुन्हेगारांना उमेदवारी देण्याची कारणं वेबसाईटवर टाका- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी का देण्यात आली, याची कारणं आणि गुन्ह्यांची माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचं आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना न्यायालयाने दणका दिला आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 48 तासांत त्यांच्यावरील गुन्ह्याची माहिती वृत्तपत्र आणि सोशल मीडियावरही देण्याचं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच केवळ गुन्हेच नाही, तर त्यांच्या यशाचा लेखाजोखाही पक्षांना जनतेसमोर मांडावा लागणार आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या नेत्यांसदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची गुरुवारी न्यायालयासमोर सुनावणी झाली, यावेळी न्यायालयाने हा महत्वपू्र्ण निर्णय दिला आहे.

दरम्यान, राजकीय नेते आणि त्यांच्यावरील गुन्हे हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या नेत्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयाला महत्व आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचंय, पण फडणवीस महाराष्ट्र सोडायला तयार नाहीत”

दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; ‘सामना’तून चंद्रकांत पाटलांवर बाण

महत्वाच्या बातम्या-

विजय देवरकोंडा करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण!

अबब…मोदींच्या सुरक्षेचा एक दिवसाचा खर्च तब्बल ‘इतके’ कोटी

केजरीवालांच्या ताफ्यात ‘मराठी’ नाव; वडील अजूनही चालवतात पंक्चरचं दुकान

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या