बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही तर लोकशाहीची चेष्टा’; सर्वोच्च न्यायालयानं भाजप सरकारला फटकारलं

मुंबई | भारतात निवडणूक आयोग ही स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. तरी देखील मागील काही वर्षांपासून अशा स्वायत्त संस्थांवर सरकारी अधिकारी पाठवले जात आहे. आता चक्क निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदावर सरकारी अधिकाऱ्याला बसवण्याचं काम गोव्याच्या भाजप सरकारने केलं आहे. यावर सर्वोच्च न्यायालयानं गोव्यातील भाजप सरकारला फटकारलं आहे.

गोव्याच्या भाजप सरकारने राज्यांच्या सचिवाकडे राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत महत्वाचा निर्णय दिला आहे.

सरकारमधील कोणत्याही कार्यालयात पदावर असलेल्या व्यक्तीला राज्य निवडणूक आयोगाचं आयुक्तपद देता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. या सुनावणी दरम्यान, न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन यांनी नाराजी व्यक्त करत ही लोकशाहीची चेष्टा असल्याचं म्हटलं आहे. निवडणूक आयोग स्वातंत्र आहे. त्याच्या स्वातंत्र्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही. तर हा संविधानाचा उपहास केल्यासारखं आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गोव्याच्या निवडणूक आयोगाला निवडणूकीसंदर्भात सूचना देखील केल्या आहेत. यामुळे गोव्यातील भाजप सरकारला चांगलीच चपराक बसली आहे. याआधीही आरबीआयच्या गवर्नरपदी शक्तीकांत दास यांना बसवल्याने केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली जात होती.

थोडक्यात बातम्या-

नवऱ्याकडून अमानुष मारहाण; मदत मागण्यासाठी गेलेल्या गर्भवती पीडितेला पोलिसांनी हाकललं!

अभिमानास्पद! सहाच्या सहा बहिणी पोलिस दलात; अनिल देशमुखांनीही केलं कौतुक

वाढदिवसाला मैद्याच्या केकऐवजी फळांचा केक कापा; सोशल मीडियावर मागणीनं धरला जोर

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुरलीधर मोहोळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

चिंताजनक! ‘कोरोना’ लसीचे डोस घेऊनही जिल्हाधिकारी आढळले ‘कोरोना पॉझिटिव्ह’

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More