Top News राजकारण

राखी बांधताना झाली गंमत, अजित दादा आणि सुप्रिया सुळेंना हसू अनावर

पुणे | रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आज देशभरात साजरा केला गेला. दरवर्षी पवार कुटुंबीयांच्या घरी देखील मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन साजरा होतो. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रक्षाबंधन सण कुटुंबियांसोबत साजरा केला आहे. मात्र यंदाच्या रक्षाबंधनात एक गमतीशीर गोष्ट घडली ज्यामध्ये सुप्रिया सुळे देखील हसू रोखू शकल्या नाहीत.

सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना ओवाळून राखी बांधली. पण, झालं असं की, सुप्रियाताईंनी अजितदादांसाठी टोपी आणली होती, पण ओवळणं झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, टोपी घालायची राहूनच गेली. त्यामुळे ‘अरेच्या टोपी इथंच राहिली’ असं सुप्रिया सुळे म्हणताच अजितदादांनाही हसू आवरलं नाही.

 

Rakhsha bandhan

Posted by Supriya Sule on Sunday, August 2, 2020

यादरम्यान समोर शरद पवार सुद्धा बसलेले होते. हा प्रकार पाहून त्यांनाही हसू आलं. राखी बांधल्यानंतर अजितदादांनी आपल्या या बहिणीचे आशिर्वाद घेतले आणि पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी कुटुंबासोबत हा रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. दरवर्षी प्रमाणे सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना राखी बांधली. यावेळी कोरोनाची परिस्थितीत असल्यामुळे अजितदादा हातातील ग्लोजसह घरी दाखल झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आई गेल्याचं दुखः बाजूला सारत त्यांनी सामाजिक कार्याचा वसा घेतला’; राजू शेट्टींनी केला सलाम

पुण्यात वाढती कोरोना रूग्णांची संख्या, 15 दिवसांत जम्बो सेंटर उभे करण्याचा मानस

‘मुंबई पोलीस तुम्ही आमची शान आहात’, सुशांत प्रकरणावर राजकारण करणाऱ्यांना केदार शिंदेंनी खडसावलं!

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी निलेश राणेंचा गंभीर आरोप, म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या