Top News

तुमच्या वयाहून दांडगा पवार साहेबांचा अनुभव- सुप्रिया सुळे

पुणे | लक्षात ठेवा जितकं तुमचं वय आहे, तितका दांडगा पवार साहेबांचा राजकारणातील अनुभव आहे, असं म्हणत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधला आहे. धनकवडी येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

पवार साहेबांनी पन्नास वर्षात काय केले, असा सवाल अमित शहा यांनी केला होता. यावर सुळे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

पवार साहेबांच्या राजकीय कार्याची पोहोचपावती तुमच्याच सरकारच्या काळात ‘पद्मविभूषण’च्या स्वरूपात त्यांना भेटली आहे. हे तुम्ही सोयीसकरपणे विसरताय, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

तुमचेच अरुण जेटली म्हणाले होते, की देशात 100 बारामती झाल्या तर या देशाचा चेहरामोहराच बदलून जाईल, हाच तुम्हाला घरचा आहेर आहे, असं म्हणत त्यांनी अमित शहांवर निशाणा साधला.

महत्त्वाच्या बातम्या

-पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने केली ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी

-हार्दिक पांड्या म्हणतो, माझ्या ‘हेलिकाँप्टर शाॅट’वर धोनीपण फिदा!

-राम मंदिर नाही तर मोदी पण नाही- कम्प्यूटर बाबा

-जेट एअरवेजनंतर आता एअर इंडियाही अडचणीत येण्याची शक्यता!

-ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटूंनी केलं लग्न

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या