महाराष्ट्र मुंबई

सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही, शेतकऱ्यांना पैसे नकोत न्याय हवाय- सुप्रिया सुळे

मुंबई | सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. शेतकऱ्यांना पैसे नकोत. न्याय हवा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी लालबाग येथील इंडिया युनायटेड मिल नंबर-5 मधील कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

केंद्रातील सरकार असंवेदनशील आहे. गरीब शेतकऱ्यांचा हे सरकार सन्मान करत नाही. शेतकऱ्यांवर अन्यायच करत आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

जे धोरण सरकारने आणलं आहे. त्यावर योग्य चर्चा करण्याची गरज आहे. देशात अस्वस्थता वाढत आहे. शेतकरीही अस्वस्थ आहेत. त्यांना पैसे नको आहेत. त्यांना न्याय हवा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

ठाकरे सरकारकडून प्रामाणिक शेतकर्‍यांना ठेंगा दाखवण्याचं काम- देवेंद्र फडणवीस

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

नरेंद्र मोदी हेच शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक आहेत- अमित शहा

“रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या