पुणे महाराष्ट्र

पुणेकरांनी बनवलेल्या लसीवर बाहेरच्यांनी क्लेम करु नये- सुप्रिया सुळे

पुणे | पुणेकरांनी बनवलेल्या कोरोनावरील लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

पुण्याच्या मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत सुप्रिया सुळे  बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

जग फिरल्यावर शेवटी आमच्या पुण्यातच लस सापडणार आहे. ही लस पुणेकरांनी शोधलीये, नाही तर कोणीतरी म्हणायचं मीच शोधली, असा टोला सुप्रिया सुळेंनी मोदींना लगावला आहे.

दरम्यान, आज या सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. सुरुवातीला म्हणत होते. सात दिवस टिकेल, सात महिने टिकेल आज तर वर्ष झालं. आता पुढची पाच वर्षेचं नव्हे तर 25 वर्ष कधी उलटतील हे कळणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

“मंत्रालयात झारीतले शुक्रराचार्य खूप, OBC आरक्षणावर गदा येत असेल तर लढावंच लागेल”

अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका”

…म्हणून ग्लेन मॅक्सवेलने मागितली केएल राहुलची माफी

यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ‘या’ महिन्यात;वर्षा गायकवाड यांची माहिती

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या