मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता शरद पवारांच्या प्रकृतीसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे.
शरद पवार यांना पोटात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आले होते. पण, पित्ताशयाचा त्रास अधिक जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली आहे.
31 मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर पुढील 2 आठवडे ते घरीच विश्रांती करणार आहे, या काळात त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहे, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे. शरद पवार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी जाणार होते. पण आता प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. वैद्यकीय तपासणीनंतर सध्या कुठलीही औषधे न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी पवार यांना दिल्याचं कळतंय.
दरम्यान, कालच शरद पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अशा अफवा उडवल्या जात आहेत. अशी कोणतीही बैठक अद्याप झालेली नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीने दिलं आहे.
थोडक्यात बातम्या-
…म्हणून हार्दिक पांड्यानं भर मैदानात घातला साष्टांग दंडवत, पाहा गमतीदार व्हिडीओ
‘अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे…; महाराष्ट्राची वाट लावू नका’
शरद पवार ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल, शस्रक्रिया केली जाणार
पवार- शहा भेटीच्या चर्चेवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
महावितरणची थकबाकी हे भाजपचंच पाप आहे- नितीन राऊत
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.