Top News

आवडता खासदार कोण?; सुप्रिया सुळेंनी सांगितलं भाजपच्या ‘या’ खासदाराचं नाव

Loading...

जळगाव | महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी कोण आवडतं? या प्रश्नाचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आणि भाजपच्या जळगावच्या खासदार रक्षा खडसे या आवडत्या महिला खासदार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.

शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशाळा तसेच उद्योजकता विकास मंचातर्फे आयोजित ‘उडान संजीवनी नव-उद्योजकांसाठी’ या कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या.

48 खासदारांमध्ये सुसंस्कृत आणि अभ्यासू असलेल्या रक्षा खडसे या माझ्या आवडत्या खासदार आहेत. धडपड करणारं नेतृत्व म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी रक्षा खडसेंचं कौतुक केलंय.

दरम्यान, रक्षा खडसे या सलग दुसऱ्यांदा जळगावमधून लोकसभेच्या खासदारपदी निवडून आल्या आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

…म्हणून 19 जिल्हे वगळून शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर होणार!

एनपीआर आणि एन

महत्वाच्या बातम्या- 

राज्यसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब!

40 दिवसांत एका एकरातून शेतकऱ्यानं कमवले 3 लाख 60 हजार रुपये!

‘देशाचे पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत’; भुजबळांच्या ‘त्या’ मागणीवर फडणवीसांचं उत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या