GUJRAT La - गुजरातमध्ये जीएसटीला विरोध, व्यापाऱ्यांना पोलिसांनी पळू-पळू मारलं
- देश

गुजरातमध्ये जीएसटीला विरोध, व्यापाऱ्यांना पोलिसांनी पळू-पळू मारलं

सूरत | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्येच जीएसटीला विरोध होताना दिसतोय. जीएसटीला विरोध करण्यासाठी सूरतमध्ये जमलेल्या कापड व्यापाऱ्यांना तर पोलिसांनी पळू-पळू मारलं. 

१ जुलैपासून संपूर्ण देशभरात जीएसटी लागू झालाय. मात्र सुरतच्या व्यापाऱ्यांचा या कराला विरोध आहे.

सरकारने सर्वप्रथम जीएसटी काय आहे हे व्यापाऱ्यांना समजून सांगण्यासाठी शिबीरं घ्यावी, अशीही काही व्यापाऱ्यांची मागणी आहे. मात्र सूरतमध्ये झालेल्या लाठीचार्जमुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय. 

पाहा व्हिडिओ-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा