बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेंद्र मोदी भगवान शंकराचा अवतार आहेत, त्यांनीच देशाला कोरोनापासून वाचवलं”

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींना भगवान शंकराचा आशिर्वाद मिळाला आहे. मोदी हे भगवान शंकराचं रुप आहे. त्यामुळेच त्यांनी देशाला कोरोनासारख्या संकटापासून वाचवलं असल्याचं हिमाचल प्रदेशमधील नगरविकास मंत्री सुरेश भारतद्वाज यांनी म्हटलं आहे. महाशिवरात्रीनिमित्तच्या एका कार्यक्रमात सुरेश भारतद्वाज बोलत होते. यासंदर्भात आऊटलूक इंडियाने वृत्त दिलं आहे.

भारत हा एकमेव असा देश आहे ज्याने दोन लसी निर्माण केल्या आहेत. आता जगभरातील इतर देश भारताप्रमाणे दोन लसी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून भारताकडून लसीसंदर्भात मदत मागत आहेत.  कोरोना लसीच्याा मोहिमेला सुरूवात झाल्यानंतर मोदींची प्रतिमा आणखीनच वाढली आहे त्यामुळेच ते शिवाचा अवतार असल्याचं भारतद्वाज यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी 2019 च्या निवडणुकीच्या निकालाआधी दोन दिवस केदारनाथमध्ये घालवले. ते दोन दिवस गुहेमध्ये ध्यान करत होते. त्यानंतर निवडणुकीत मोठा विजय मिळाला याचं आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी स्मरण केलं पाहिजे असंही सुरेश भारतद्वाज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींनी कोरोनापासून सर्वांना वाचवलं असं म्हणतानाचा भारतातील मृत्युदर कमी असण्याचंही श्रेयही भारतद्वाज यांनी नरेंद्र मोदींंना दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

’21 तारखेला जर परीक्षा झाली नाही तर…’; गोपीचंद पडळकरांंचा राज्य सरकारला इशारा

“राज्याचा अर्थसंकल्प फक्त पुण्याभोवती केंद्रीत, महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक”

व्वा पंत! रिषभचा जोफ्रा आर्चरच्या बॅालिंगवर जबरदस्त ‘रिव्हर्स स्वीप’, पाहा व्हिडीओ

मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही- अजित पवार

“मंत्रिपदासाठी पैसे दिलेत, ते वसूल झाल्याशिवाय राजीनामा कसा देईल?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More