बीड | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त सोशल मीडियावरील फेक अकाऊंटवरच चालतो, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. ते बीड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फेक अकाऊंट काढले आहेत. पैसे देऊन स्वत:च्या कमेंट्स वाढवतात आणि राष्ट्रवादी खूप मोठा पक्ष असल्याचा दावा करतात, असं ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खूपच खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. कधी देवेंद्र फडणवीस तर कधी पंकजा मुंडे यांच्या विरोधात काहीही पोस्ट टाकत आहेत. अशा फेसबुक अकाऊंटचा शोध घेऊन त्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या–
-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या; निलंबन करण्याची मागणी
-…अखेर अमित राज ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाचा मुहूर्त ठरला?
-संजय राऊतांचा अमित शहांना चिमटा; चाणक्य असंही म्हणाला होता…
-मनसेचं आता ‘मिशन मराठवाडा’; औरंगाबादमध्ये मेळाव्याचं आयोजन
-धक्कादायक!!! ‘बिग बॉस मराठी’मधून अभिनेत्री रेशम टिपणीस बाहेर???