आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकत सुर्यकुमारने रचला इतिहास, पाहा व्हिडीओ
अहमदाबाद | भारत आणि इंग्लंडमध्ये चालू असलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजीला येत इंग्लंडला 186 धावांचं लक्ष्य दिलं आहे. आजच्या सामन्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच चेंडू खेळणाऱ्या सुर्यकुमारने षटकार ठोकत इतिहास रचला आहे.
भारताने फलंदाजीला येत पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माने षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. मात्र जोफ्रा आर्चरने त्याला बाद केलं. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या जागेवर सुर्यकुमार आला आणि त्याने नटराजन शॉट खेळून षटकार खेचला. सुर्याने हा षटकार ठोकत आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पहिल्या चेंडूत षटकार खेचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
याआधी पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरने भारताविरूद्ध 2007 साली षटकार ठोकला होता. तर मंगालिसो मेसेह्लेने श्रीलंकेच्याविरूद्ध 2017 साली षटकार खेचला होता तर आज सूर्यकुमार यादवने हा कारनामा करत आपल्या नावे खास रेकॉर्ड केला आहे.
दरम्यान, सुर्यकुमार यादवनं मिळालेल्या संधीचं सोनं करताना इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. सुर्यकुमार यादवनं 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील पहिल्याच डावात अर्धशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.
England: first time?
SKY: yes
🇮🇳🏴#INDvENG pic.twitter.com/AY6s75v4lH— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) March 18, 2021
Talk about making a cracking start! 👌👌
DO NOT MISS: @surya_14kumar opens his run-scoring account in international cricket in some style! 👏👏 #TeamIndia @Paytm #INDvENG
Watch SKY’s sensational first-ball SIX 🎥 👇https://t.co/8R96Wg67cm pic.twitter.com/hUqb0XAwmn
— BCCI (@BCCI) March 18, 2021
थोडक्यात बातम्या-
जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!
फक्त याच नाही, मागच्या सरकारने देखील अन्यायच केला- ज्येष्ठ IPS अधिकारी संजय पांडे
…अन् प्रवाशांनी खचाखच भरलेली रेल्वे जेव्हा उलटी धावायला लागते, पाहा व्हिडिओ
फाटलेली जीन्स युवा सांभाळतील पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?- उर्मिला मातोंडकर
ऐकावं ते नवलचं! ट्रकमध्ये हेल्मेट नाही घातलं म्हणुन चालकाला तब्बल एवढा दंड!
Comments are closed.