बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईचं टेन्शन वाढलं! फाॅर्मात असलेला हुकमी एक्का स्पर्धेबाहेर

मुंबई | आयपीएलचा पाचवेळेचा विजेता संघ मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात आपल्या लौकिकाला साजेशा खेळ करत नाहीयं. परिणामी मुंबई संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. अशातच संघाला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे.

मुंबईच्या फलंदाजीचा कणा असलेला धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला आहे. परिणामी येणाऱ्या सामन्यांमध्ये यादव खेळू शकणार नाही. बीसीसीआयच्या मेडिकल टिमसोबत तो दुखापतीवर उपचार घेत आहे.

सुर्यकुमार यादवनं यंदाच्या हंगामात मुंबईकडून 3 अर्धशतकांसह 303 धावा फटकावल्या आहेत. गुजरातसोबतच्या सामन्यात खेळताना यादवच्या डाव्या हाताला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. पण आता थेट तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

दरम्यान, भारतीय संघातील मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून सुर्यकुमार यादवला ओळखलं जातं. अशातच आता काही महिन्यांवर आलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर यादवची दुखापत भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे.

थोडक्यात बातम्या – 

संदीप देशपांडेंच्या अडचणीत वाढ! अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव

दहावी-बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर

श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी! महिंदा राजपक्षेंचा राजीनामा

सत्र न्यायलयाचा राणा दांपत्याला दणका; अटींचं उल्लंघन अंगलट येणार?

संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? किरीट सोमय्यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More