Top News मनोरंजन

‘सुशांत संशयास्पद औषधं घेत होता’, जीम ट्रेनरचा धक्कादायक खुलासा

मुंबई | 14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. मात्र अजूनही त्याच्या आत्महत्येमागचं कारण समजलेलं नाही. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. दरम्यान आता सुशांतच्या जीम ट्रेनरने धक्कादायक खुलासा केलाय. सुशांतच्या जीम ट्रेनरने दिलेल्या माहितीनुसार, सुशांत डिसेंबरमध्ये अशी काही औषध घेत होता जी त्याने आधी कधीही घेतली नव्हती.

सुशांतचा ट्रेनर सामी अहमद याने एका मीडिया हाऊसला सांगितल्याप्रमाणे, सुशांत सिंग राजपूत डिसेंबर 2019 पासून काही संशयास्पद औषधं घेत होता. याचा त्याच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होत होता. सुशांतने अशी औषधं आधी कधीही घेतली नव्हती.

अहमद पुढे म्हणाला, “या औषधांचं सेवन केल्यानंतर त्याचे हातपाय थरथराचे. बऱ्याचदा तो अस्वस्थ राहू लागला होता. सुशांतने एक दोन महिन्यांसाठी या औषधांचा कोर्स करत असल्याचं सांगितलं होतं. मी याबाबत त्याला मनाई केल्यावर तो म्हणाला की, एकदा कोर्स सुरू केल्यानंतर असा मध्येच सोडू शकत नाही.”

अहमदच्या सांगण्यानुसार, नोव्हेंबरमध्ये सुशांतने मला सांगितलं होतं की, पॅरीसवरून परतल्यानंतर त्याला डेंग्यू झाला आहे. त्यांचे डॉक्टरांकडून काऊसिलिंगही सुरू होतं. सुशांतचे वागणं खूप बदललं होते. तो घेतलेल्या औषधांमुळे सुशांतला नीट वर्कआऊटदेखील करता येत नव्हतं.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड- अशोक गेहलोत

वाढदिवस विशेष: तापसी पन्नूचा अभियंता ते बॉलिवूडचा प्रवास वाचून तुम्ही थक्क व्हाल….!

या सरकारचं स्टेअरिंग कुणाच्या हाती?, उद्धव ठाकरेंचं भन्नाट उत्तर

“सरकार मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे… मंत्री जणू झपाटलेल्या सिनेमातील कलाकार”

“सध्याचं सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या