मनोरंजन

सुशांतच्या खात्यातील 15 कोटी कुठं गेले?; एक ‘मोठा’ व्यवहार माहीत झाला आहे!

मुंबई | सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात बिहार पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. सुशांतच्या खात्यावरून 15 कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाला असून त्याची रियाकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणी ईडीकडून मनी लाॅड्रिंगचा तपास सुरू असताना सुशांतच्या एका खात्यातून झालेल्या मोठा आर्थिक व्यवहाराची माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुशांतसिंह मालाडमधील एका फ्लॅटचा हप्ता भरत असे. मात्र हा फ्लॅट सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडाच्या नावावर असल्याची माहिती आहे. पूर्व मालाडमधील हा फ्लॅट तब्बल 4.5 कोटी रूपयांचा असल्याचा दावाही आता करण्यात येत आहे.

सुशांत या फ्लॅटचा हप्ता भरत असून अंकिता सध्या त्याठिकाणी वास्तव्यास आहे. पोलिसांच्या चौकशी दरम्यान रियाकडूनही या फ्लॅटची माहिती देण्यात आली होती. सुशांत या फ्लॅटचा हप्ता भरत असे. मात्र अंकिताला फ्लॅट सोडायला त्याला कधी सांगता येत नसायचं, अशी माहिती रियानं दिली होती.

मात्र मालाडचा फ्लॅट स्वतः 1.35 कोटी रुपयांमध्ये स्वतः खरेदी केल्याचा दावा आता अंकितानं  केला आहे. पवित्र रिश्ता या मालिका दरम्यान सुशांतसोबत लिव्ह इन रिलेशनध्ये आम्ही याच फ्लॅटमध्ये राहत असल्याचं अंकितानं सांगितलं. तसेच माझ्याच खात्यामधून फ्लॅटसाठी प्रत्येक महिन्याला ईमएमआय जात असल्याचा खुलासाही अंकितानं यावेळेस केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल- रामनाथ कोविंद

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल कोरोनाबाधित

…तर नाईलाजाने डॉक्टरांवर मेस्मा लावाला लागेल, हसन मुश्रीफ यांचा इशारा

पार्थ समजदार, तो झाला प्रकार विसरून जाईन; कोल्हापूरच्या आत्याची प्रतिक्रिया

सुप्रिया सुळेंनंतर पार्थ पवार आता अभिजीत पवारांच्या भेटीला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.