मनोरंजन

आत्महत्येच्या रात्री नक्की काय घडलं?; सुशांतच्या मित्राने केला खुलासा

मुंबई | सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांकडूनही या केसची तपासणी केली जात आहे. मात्र आत्महत्येच्या रात्री नक्की काय घडलं, याचा खुलासा आता सुशांत सोबत राहत असलेल्या त्याच्या जीवलग मित्राने केला आहे.

सिद्धार्थ पिठानी हा सुशांतचा मित्र असून क्रियेटिव्ह कंटेंट रायटर म्हणून तो काम करत असे. सुशांतनं 150 ड्रिम्सचं स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी मी त्याच्या सोबत राहत असे. घटनेच्या दिवशी सुशांत शांतच होता. रात्रीचं जेवण करून आम्ही आपापल्या खोलीत झोपायला गेलो. मात्र मला काही केल्या झोप लागत नव्हती.

सुशांत इतक्यात रात्री 1 वाजता माझ्या रूममध्ये येत मी अजून झोपलो का नाही. अशी माझी विचारपूस देखील त्यानं केली. यानंतर मी सुशांतला त्याच्या रूमपर्यंत सोडून आलो. सकाळी उठल्यावर घरकाम करत असलेला मुलगा माझ्याकडे आला. सुशांतच्या रूमच दार बंद असल्याचं त्यानं मला कळवलं. मी माझ्या काही मित्रांना तातडीनं बोलावून घेतलं.

यानंतर दार उघडल्यावर सुशांत मृतावस्थेत आढळून आला. तो असं काहीसं करेल याचा अंदाजही त्या दिवशी कधी आला नाही, असा खुलासा सिदार्थनं केला आहे. रिया आणि सुशांत रिलेशनमध्ये असल्याची माहिती मला होती. मात्र याबाबत सुशांत कधीच बोलत नसल्याचं सिदार्थनं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

सध्या महाविकास आघाडी सरकारची अवस्था ‘नाचता येईना म्हणे अंगण वाकडं’- चंद्रकांत पाटील

दुचाकीवरून प्रवास करताना लोकल ब्रँडचे हेल्मेट वापरल्यास होणार दंड!

अविनाश… आम्ही ठाण्याला येतोय, कोण अडवतंय बघूया- संदीप देशपांडे

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड- अशोक गेहलोत

वाढदिवस विशेष: तापसी पन्नूचा अभियंता ते बॉलिवूडचा प्रवास वाचून तुम्ही थक्क व्हाल….!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या