बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“12 आमदारांवरील निलंबनाची कारवाई कायदेशीरच, निलंबन मागे घेण्याचा राज्यपालांना अधिकार नसतो”

मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला आहे. भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातल्यानं 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. भाजपच्या या 12 निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन निलंबनाच्या कारवाई विरोधात दाद मागितली आहे. अशातच आता विधानसभा अध्यक्षांनी केलेली  कारवाई कायदेशीर असल्याचं मत प्रसिद्ध वकील अ‍ॅड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केलं आहे.

अ‍ॅड. असीम सरोदे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या 12 आमदारांवर केलेली कारवाई कायदेशीर आहे. अपात्रता व  निलंबन यामध्ये फरक असतो. निलंबन मागे घेण्याचा राज्यपालांना काहीही अधिकार नसतो .

तसेच काहीही झाले की विरोधी पक्षाचे आमदार विनाकारण राज्यपालांकडे जातात आणि त्यांना राजकारणात ओढतात. मात्र, या कृत्यामुळे राज्यपाल पदाची प्रतिष्ठा मलीन होत आहे, असं देखील  सरोदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर यांचा समावेश आहे. या सर्वांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘वासरू मारलं म्हणून कुणी गाय मारत असेल, तर…’; फडणवीसांचा सूचक इशारा

“…पण हे मुंबई मॉडेल नाही, तर मृत्यूचं मॉडेल”

“12 आमदारांचं निलंबन हा लोकशाहीचा खून”

अधिवेशनादरम्यान आजही सभागृहात राडा; आमदार रवी राणांनी विधानसभेतील ‘राजदंड’ पळवला

हेलिकॉप्टरमधून नवरदेवासोबत खासदार अमोल कोल्हेंनी केली दमदार एन्ट्री!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More