बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू; लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

नवी दिल्ली | सध्या फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशभरात आत्महत्येची प्रकरणं चर्चेचा विषय बनली आहेत. भाजप खासदार मोहन डेलकर यांच्या कथित आत्महत्येनंतर आता आणखी एका भाजपच्या खासदाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामस्वरूप शर्मा यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. त्यांच्या खोलीत त्यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळला आहे.

दिल्लीच्या गोमती इमारतीत खासदार रामस्वरूप शर्मा राहत होते. गोमती इमारतीच्या स्टाफकडून पोलिसांना सकाळच्या सुमारास फोन आला. रामस्वरूप शर्मा यांच्या खोलीचा दरवाजा बंद असून काहीतरी गडबड असल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिस दरवाजा तोडून आत गेल्यानंतर त्यांना शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळुन आला.

रामस्वरूप शर्मा यांचं निधन दिल्लीतील रूग्णालयात एका आजारानं झालं असल्याची माहिती समोर आली होती. परंतू त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती आता दिल्ली पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, काही दिवसापुर्वी रामस्वरूप यांना प्रकृती बिघडल्यामुळं दिल्लीतच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील होत होती. पण त्यांच्या या आत्महत्येचा खुलासा झाल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी शर्मा यांच्या निधनावर ट्विटदेखील केलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

मद्यप्राशन केलेल्या तरुणीचा भररस्त्यात राडा; हटकणाऱ्या पोलिसांची धरली काॅलर, पाहा व्हिडीओ

महापौर मुरलीधर मोहोळांनी लागु केले पुण्यात नवे निर्बंध; नागरिकांची साथ कमी पडल्यास लॉकडाऊन होणार!

महेश मोतेवारने दगडूशेठला अर्पण केलेला ‘तो’ सव्वा किलो सोन्याचा हार ‘सीआयडी’च्या ताब्यात

सचिन वाझेंनी वापरलेल्या ‘त्या’ मर्सिडीज गाडीत सापडलं नोटा मोजण्याचं मशीन आणि…

MPSC ची तारीख तर ठरली पण…; विद्यार्थ्यांसमोर आणखी नवा पेच

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More