#Video | सहकाऱ्याने सनीच्या अंगावर सोडला साप, पाहा काय झालं…

मुंबई | अभिनेत्री सनी लिओनीच्या सहकाऱ्याने तिच्या अंगावर साप सोडला आणि सनी लिओनीची त्रेधातिरपीट उडाली. सनीने यासंदर्भातला व्हिडिओ ट्विट केला आहे. 

सनीच्या आगामी सिनेमाचं शुटिंग सुरु असताना हा प्रकार घडला. गंमत म्हणून तिच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार केला. मात्र या प्रकारामुळे सनी चांगलीच घाबरली होती. 

दरम्यान, ज्याप्रकारे सनीने सापाला फेकलं ते पाहून काही प्राणीमित्रांनी तिच्या या ट्विटवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पेटा संस्थेलाही ट्विटमध्ये टॅग केलं आहे. त्यामुळे या प्रकारामुळे सनी आणि तिच्या टीमच्या अडचणी वाढू शकतात.