बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदींना विरोध म्हणजे भारतमातेला विरोध, तुम्हाला मोदींचीच लस घ्यावी लागणार”

नवी दिल्ली | भाजपला निरोप द्या, आम्हाला भाजप नको. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडही पाहायचं नाही. आम्हाला दंगल, चोर, दुर्योधन, दुःशासन, मीर जाफर नको, असं म्हणत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. पूर्व मदिनापूर येथे ममतांनी रॅलीला संबोधित करताना ममता यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. ममता बॅनर्जींनी केलेल्या या टीकेला भाजपवासी झालेले भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

तुम्हाला कोरोनाविरुद्ध पंतप्रधान मोदींची लस घ्यावी लागेल. ते निवडून आलेले पंतप्रधान आहेत. त्यांच्याविरुद्ध बोलणं म्हणजे लोकशाहीविरुद्ध बोलणं आहे. त्यांच्याविरुद्ध बोलणं म्हणजे भारत मातेविरुद्ध बोलण्यासारखंच आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशकडे लस नाहीये. त्यामुळे तुम्हाला मोदींचीच लस घ्यावी लागणार असल्याचं सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे.

मता बॅनर्जी यांच्या पायाला लागलं असलं तरी त्या हार न मानता व्हिलचेअरवरून प्रचार करत आहेत. ममता यांच्या पक्षातील त्यांचे जुने सहकारी सुवेंदू अधिकारी यांनीच प्रत्युत्तर दिलं आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींच्या पक्षातील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, येत्या काही महिन्यांवर पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आल्या आहेत. सर्व पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. प्रचारसभांना सुरूवात झाली असून आपल्या पुर्ण ताकदीनिशी पक्ष मैदानात उतरले आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

“राष्ट्रवादी शिस्तीचा पक्ष असून सर्व निर्णय शरद पवारच घेतील”

“महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”

‘…जबाबदार वाझे’; मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणावर अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

‘मी बंगळुरू सोडलं नाही’; हितेशा चंद्राणीचं इन्स्टाग्राम पोस्टद्वारे स्पष्टीकरण!

“तुम्हाला जर फाटकी जीन्स घालायची असेल तर कूल दिसा भिकाऱ्यासारखं नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More