मुंबई | एआयएमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. यावर अभिनेत्री स्वरा भास्करनेही ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘बैठ जाओ चचा!! कोणाची मदत करु शकत नसाल तर किमान शांत राहत जा. अशा प्रकारची अनावश्यक विधानं, बडबड करु नका. तुमच्या अशा बेताल अशा वक्तव्यांमुळं चळवळींच नुकसान होतं, असं म्हणत स्वरानं पठाण यांच्यावर शाब्दिक तोफ डागली आहे.
‘बेवकूफ, जाहील, तू कोणाची नोकरी करत आहेस? एकत्र राहण्याच्या काळात असं बोलत असाल तर तुम्ही पंधरा कोटीचं राहाल, अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दिली आहे.
दरम्यान, आम्ही पंधरा कोटी आहोत, पण 100 कोटींनाही भारी आहोत. लक्षात ठेवा ही गोष्ट, असं वादग्रस्त वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं होतं.
बैठ जाओ चचा! 🙄🙄🙄🙄 If you cannot say something helpful don’t say it at all! Stupid, irresponsible and highly condemnable statement !!! Such talks only harm the movement! #shame https://t.co/sIsxLMSkZZ
— Swara Bhasker (@ReallySwara) February 20, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“ओवेसी व्हायरसने भारतात कसाब तयार होत आहेत”
शिवसेना यूपीएत जाणार?; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधींच्या भेटीला
महत्वाच्या बातम्या-
मी माफी मागणार नाही, संविधानात राहून बोललोय- वारीस पठाण
लहान भाऊ आज दिल्लीत घेणार मोठ्या भावाची भेट
“कोणत्याही पुराव्याअभावी इंदोरीकर महाराजांवर सध्यातरी कारवाई करू शकत नाही”
Comments are closed.