बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुमच्या जिल्ह्यात काय सुरू अन् काय बंद? ; वाचा संपुर्ण महिती

मुंबई | राज्यातील अनलॉक बाबतचा आदेश अखेर जारी करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री स्तरनिहाय अनलॉकचा आदेश देण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता या दोन आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. या पाच स्तरात कोणते जिल्हे येतात आणि या जिल्ह्यात काय सुरू राहणार आणि काय बंद याची पुर्ण माहिती खालीलप्रमाणे-

पहिला स्तर – या स्तरात अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे, वर्धा हे जिल्हे असतील. यात खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस 100 टक्के क्षमतेने  सुरु होतील. मात्र इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील. आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल. रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होणार आहे.

दुसरा स्तर- या स्तरात औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी यांसारखे जिल्हे असतील. 50 टक्के क्षमतेने हॉटेल, मॉल, चित्रपट गृह, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम सुरु असतील. लोकल मात्र सुरु असणार नाही. सार्वाजिनक जागा, खुले मैदान , माॉर्निंग वॉक आणि सायकल चालवण्यास परवागनी असेल. लग्न सोहळा मंगल कार्यालयात 50 टक्के आणि जास्तीत 100 लोक उपस्थितीत राहू शकतील.

तिसरा स्तर- या स्तरात अकोला, अमरावती, बीड, पुणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील. मॉल्स आणि चित्रपट गृह सर्व बंद राहतील. लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. शेतीविषयक सर्व कामे करता येतील.

चौथा स्तर- या स्तरात रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. अत्यावश्यक सेवा 2 वाजेपर्यंत सुरु असतील. सरकारी खासगी कार्यालयात 25 टक्के उपस्थितीसह कामकाज करता येईल. लग्न सभारंभाला 25 लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे. अंत्ययात्रेला 20 लोक उपस्थित राहू शकतील.

पाचवा टप्पा- यात केवळ कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश असणार आहे, यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णपणे बंद राहतील.

दरम्यान, हे स्तर जिल्ह्यासाठी असले तरी, काही शहरांसाठी नियम बदलण्यात येऊ शकतो. पुणे, रायगड, मुंबई, नाशिक यासारख्या शहरात काही प्रमाणात आणखी सुट दिली जाऊ शकते.

थोडक्यात बातम्या-

नोकरीची सुवर्णसंधी; कोकण रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, असा करा अर्ज

भाजप मनसेला टाळी देणार का?; मनसे-भाजप युुतीबाबत फडणवीस म्हणाले…

अनलॉकचे पाच टप्पे निश्चित; सरकारकडून नियमावली जाहीर, वाचा एका क्लिकवर

फेसबुकचा डोनाल्ड ट्रम्प यांना झटका; केली ही मोठी कारवाई

…तोपर्यंत कुणी माईचा लाल हे सरकार पाडू शकत नाही- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More