लखनऊ | कोरोना महामारीचं संकट देशावर आलं असताना केंद्र सरकारने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अनेक निर्बंध लादले होते. टुरिस्ट व्हिजावर भारतात आलेल्या तबलिगी जमातच्या लोकांनी मशिदीत फिरून कोरोना पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
लॉकडाऊन दरम्यान सरकारच्या नियमांचे उल्लंघन केले आणि कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार केल्याचा आरोप तबलिगी जमातवर केल्यानंतर अनेक चर्चा झाल्या आणि टीकाही झाल्या होत्या. मात्र आता तबलिगी जमातच्याच लोकांनी आम्हीच भारतात कोरोनाचा प्रसार केल्याची कबुली दिली आहे.
थायलंड, बांग्लादेश, कझाकिस्तान, किर्गिस्तान येथील आरोपींविरोधात भारतात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांवर सुनावणी करताना 51 जणांना सी जे एम न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
तबलिगी जमातच्या लोकांनी आम्हीच भारतात कोरोना पसरवल्याची कबुली दिल्याने आता अनेक चर्चांना विराम मिळाला आहे. तबलिगी जमातची स्थापना 1926 साली झाली आणि इस्लामचा प्रचार व प्रसार करण्याचे काम तिकडे चालते.
थोडक्यात बातम्या-
“…म्हणून मृत्यूपूर्वी त्यांनी स्टेडियम आपल्या नावावर करून घेतलं”
काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं राहुल गांधींना फटकारलं, म्हणाले…
…अन् त्याने लोखंडी रॉड डोक्यात मारून वडिलांच्या केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
“मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा वर्षभराचा प्रवास”
चंद्रकांत खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना निवडणुकीत उभं केलं होतं”
Comments are closed.