देश

“ताडी गंगेच्या पाण्यापेक्षा शुद्ध, ताडी प्यायल्याने कोरोना होत नाही”

लखनऊ | ताडी प्यायल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही. तसेच ताडी ही गंगेच्या पाण्यापेक्षा जास्त शुद्ध आहे, असा दावा बसपाचे उत्तर प्रदेशमधील प्रमुख नेते भीम राजभार यांनी केला आहे.

भीम राजभार यांनी एका सर्वाजनिक कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे वक्तव्य केलं आहे. यावेळी राजभार यांनी शेतामध्ये उत्पादन घेतल्या जाणाऱ्या ताडीचं महत्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं.

आमच्या समाजातील अनेकजण भरपूर ताडी पितात. याच कारणामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही, असंही भीम राजभार म्हणाले.

राजभार समाजामध्ये लहान मुलांनाही ताडी पाजली जाते असा संदर्भ देत भीम राजभार यांनी उपस्थितांना ताडीचं महत्व समाजवून सांगण्याचा प्रयत्न केला.

थोडक्यात बातम्या-

…अन्यथा तुर्कीसारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही- रोहित पवार

‘राजा इतना भी फकीर मत चुनो की…’; नवजोत सिद्धूंचा मोदींवर निशाणा

“राम मंदिरासाठी राहुल गांधींकडूनही देणगी घेणार”

नरेंद्र मोदींना टॅग करत करण जोहरने केली मोठी घोषणा!

भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्न सोहळ्याची चौकशी होणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या