बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

याला म्हणतात ऑफर! अवघ्या 25 हजारात होंडा अॅक्टिव्हा आणा घरी, जर आवडली नाही तर….

नवी दिल्ली | प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वत: च घर, गाडी, सुखी कुटुंब असावं. यामध्ये सुरूवातीला सर्वांना गरजे लागते ती म्हणजे गाडीची. आपली आवडती दुचाकी आपण घेतो त्यानंतर आपल्या इतर स्वप्नांच्या पाठीमागे धावतो. परंतू दुचाकी अगदी तुमच्या मनासारख्या किंमतीत मिळत असेल तर आनंदच. आता होंडा अॅक्टिव्हा तुमच्यासाठी केवळ 25 हजारांमध्ये उपलब्ध आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर गाडी आवडली नाही तर तुम्ही परत देखील करु शकता.

या स्कूटरमध्ये 109.5 सीसीचे इंजिन आहे. तसेच 7.68 बीएचपीची पाॅवर आणि 8.79 एनएमचे पीक टाॅर्क निर्माण करते. या स्कूटरचे ट्रान्समिशन ऑटोमॅटिक आहे. ही स्कूटी एक लीटर पेट्रोलवर 60 किलोमीटरचे मायलेज देते. तिच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हिलमध्ये कंपनीने ड्रम ब्रेकचे काॅम्बिनेशन दिले आहेत.

या स्कूटीचे दोन्ही टायर ट्यूबलेस आहेत.  तसेच याचे फिचर्स पाहिल्यास स्टार्ट-स्टाॅप स्वीच, डबल एलआयडी एक्सटर्नल फ्यूल फिल, सायलंट स्टार्टविथ एसीजी, इंडियन किल स्वीच, फ्यूल गाॅज, लो बॅटरी इंडीकेटर आणि पास लाईट सारखे फीचर्स आहेत.

दरम्यान, शोरुममधून ही गाडी खरेदी केल्यास याची किंमत 69 हजार 80 रुपये मोजावी लागेल. cars24 या वेबसाईट वर होंडा अॅक्टीव्हा लिस्ट करण्यात आली आहे. यामध्ये या गाडीची किंमत 25 हजारांपर्यंत आहे. तसेच जर ही गाडी तुम्हाला 7 दिवसांमध्ये आवडली नाही किंवा त्यात काही बिघाड झाला तर तुम्ही गाडी शोरुमकडे परत करु शकता. त्यामुळे दुचाकी प्रेमींनी लवकरात लवकर याबाबतची परिपुर्ण माहिती घ्यावी.

थोडक्यात बातम्या-

‘या नेत्यासोबतची मैत्री आणि विश्वासच लोकशाहीचा सर्वात मोठा विजय’; काॅंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं मोदींकडून कौतुक!

“परमबीर सिंह यांना वाचवणं भाजपसाठी गरजेचं आहे”

“रस्ते बांधणं म्हणजे ‘रॉकेट सायन्स’ नाही, ठाकरे सरकार सत्तेत आहे तोपर्यंत…”

”नाना पटोले काहीही बोलतात, नाना असे व्यक्ती आहेत जे…”

“मी शेतकऱ्यांच्या बांधावर होतो, त्यावेळी पंकजा मुंडे अमेरिकेत…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More