Top News महाराष्ट्र मुंबई

…त्या लोकांवर कडक कारवाई करा; आदित्य ठाकरे यांचे आदेश

मुंबई | कांदळवनावर डेब्रिज टाकून त्याचं नुकसान करुन पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.

कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी सहय़ाद्री अतिथीगृहावर बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कांदळवनाचे एपीसीसीएफ वीरेंद्र तिवारी, सीसीएफ अरविंद आपटे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ॉकांदळवनाचे अतिक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे, संरक्षणासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर, वन कर्मचाऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा देणे आदी उपाययोजनांवर भर देण्यात यावा, अशा सूचनाही ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

पर्यावरण रक्षणाच्या प्रक्रियेत कांदळवन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महसूल, वन, पर्यावरण आदी संबंधित विभागांनी राज्यातील कांदळवन क्षेत्र संरक्षित करणे, अधिसूचीत करणे यासाठी समन्वयाने काम करावे, असंही ते यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

एकनाथ खडसेंची भोसरी भूखंड प्रकरणी ईडी कार्यालयात चौकशी!

राज्यात 34 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान!

‘हे’ कारण सांगत सुप्रीम कोर्टाद्वारे स्थापित समितीतून भूपिंदरसिंग मान बाहेर

रेणू शर्माच नव्हे तर त्यांचा वकीलही वादग्रस्त; या गोष्टीमुळे अडचणी वाढणार?

भाजप नेत्यामुळे धनंजय मुंडेंना राजकीय जीवदान; राजीनामा देणार नाहीत?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या