बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानात खळबळ! ‘या’ स्टार खेळाडूची तालिबान्यांकडून हत्या

काबूल | अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर केल्यामुळे अफगाण नागरिकांवर तालिबान्यांकडून कडक निर्बंध घालण्यात आले. ज्या लोकांनी हे नियम धुडकावून लावले, त्यांना तालिबान्यांकडून जबरदस्त शिक्षा सुनावण्यात आली. तर काहींची हत्या देखील तालिबान्यांकडून करण्यात आली. अशीच एक घटना ऑक्टोबर महिन्यात घडली आहे. अफगाणिस्तानमधील ज्युनिअर महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाच्या एका महिला खेळाडूचा तालिबान्यांकडून शिरच्छेद केल्याची घटना उघडकीस आली आहे.

व्हॉलीबॉल संघाच्या प्रशिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार महजबीन हकिमी या महिला खेळाडूची तालिबान्यांनी ऑक्टोबर महिन्यात हत्या केली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांना वारंवार तालिबान्यांकडून धमकवण्यात आलं. महजबीन हकिमी हिच्या मृत्यूदेहाचे फोटो अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच तिची तालिबान्यांनी हत्या का केली. याबद्दल अजूनही कोणतीही माहिती समोर आली नाही.

अफगाणिस्तानमध्ये व्हॉलीबॉलची पहिली टीम 1978 साली तयार झाली होती. तालिबान्यांनी सत्ता काबीज करण्याच्या अगोदर महजबीन ही काबूल नगरपालिका व्हॉलीबॉल क्लबसाठी खेळत होती. महजबीन हकिमी ही स्टार खेळाडू होती. त्यामुळे व्हॉलीबॉलचा संघ देशातील अनेक तरूणींसाठी प्रेरणा देत होता.

दरम्यान, तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर अफगाण महिलांवर अनेक निर्बंध घालण्यात आले. अलिकडेच झालेल्या नवीन मंत्रिमंडळात देखील महिलांना स्थान दिलं नाही. त्यामुळे तेथील महिलांची परिस्थिती अशा घटनांमुळे आता दिवसेंदिवस बिघडत चाललेली दिसून येत आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

पीककर्ज घेताय का? असे असतील बँकांचे नवीन निकष; जाणून घ्या सविस्तर माहिती

गरिबांना लुटणाऱ्यांना सरकार सोडणार नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

काय सांगता! मृत्यूच्या 70 वर्षांनंतर देखील आजही अनेकांना जीवनदान देतेय महिला

भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर काय होणार? वाचा काय सांगतो ICCचा नियम

उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीने हाहाकार! तब्बल 46 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More