बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबानला झटका, पंजशीरच्या वाघांनी तालिबानच्या तावडीतून सोडवले ‘इतके’ जिल्हे!

काबुल | अवघं जग सध्या तालिबान आणि अफगाणिस्तान भोवती फिरत आहे. तालिबानने अफगाणचं जनजीवन अक्षरश: उद्ध्वस्त करून टाकलंय. संसद, राष्ट्रपतींच निवासस्थान, मंत्रालय, क्रिकेट मुख्यालय यांची पार दैना करून टाकली आहे. काबुल विमानतळावरील प्रचंड गर्दी ही तालिबानच्या अराजकतेची साक्ष देत आहे. या वाईट घटनांमध्ये एक चांगली घटना सुद्धा पंजशीर प्रांतातून समोर आली आहे.

घाबरलेल्या, हताश झालेल्या जनतेला अहमद मसुद तालिबान विरूद्ध लढण्याचं बळ देताना पहायला मिळत आहेत. राष्ट्रपती अशरफ घनी पळून गेल्याने आता एकाकी पडलेल्या जनतेला कोण सावरणार हा प्रश्न पडला असताना देशातील जनतेसाठी अहमद मसुद हे आपल्या सैनिकाना घेऊन पंजशीर या प्रांतात लढत आहेत हा दिलासादायक चित्र आहे.

तालिबानने आपल्या दहशतवाद्यांना पंचशीर प्रांत कसल्याही परिस्थितीत मिळवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पंजशीर प्रांतात तालिबान सोबत लढण्यासाठी अहमद मसुद यांनी रेजिस्टेंस-2 या तुकडीची स्थापना केली आहे. या तुकडीचे नेतृत्व अहमद मसुद हे करत आहेत. यांनी पुल-ए-हिसार, देह सलाह, बानु या तीन जिल्ह्यातुन तालिबानला बाहेर काढलं आहे.

तालिबानच्या हातातून हे तीन जिल्हे मिळवताना झालेल्या युद्धात 300 हुन अधिक तालिबानी मारले गेले आहेत. अहमद मसुद आणि अमरूल्ला साहेल यांच्या नेतृत्वात आफगाणिस्तानच्या सैन्यातील सैनिक सुद्धा सामिल होण्यासाठी पंजशीर प्रांतात जमा होत आहेत. तालिबान आणि पंजशीर यांच्यात आता सरळ युद्ध होणार असं स्पष्ट दिसत आहे.

थोडक्यात बातम्या

“भान हरवलेल्या नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे”

“…म्हणून मुस्लिमांसाठी भारत सर्वात सुरक्षित देश”

“उद्धव ठाकरेंविरूद्ध अपशब्द वापरणाऱ्यांचे हात छाटण्याची शिवसेनेत धमक”

नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश, मुख्यमंत्र्यांविरोधातील वक्तव्यानंतर राज्यभरात गुन्हे दाखल

‘कुठल्याही किंमतीत गुडघे टेकणार नाही’; पंजशीरमध्ये अहमद मसुदची तालिबान्यांना तगडी टक्कर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More