बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतून कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर, टास्क फोर्सने केली महत्त्वाची मागणी

मुंबई | कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिलासादायक चित्र दिसत असतानाच देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिल्लीसह काही राज्यात कोरोनाने धुमाकुळ घालायला सुरूवात केली असताना आता मुंबईतूनही (Mumbai) कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे.

मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईत कोरोना रूग्णसंख्या दुपटीने वाढत असून गेल्या 57 दिवसांत पहिल्यांदाच मुंबईत 100 पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. बीएमसीच्या (BMC) आकडेवारीनुसार मुंबईत 102 नवे रूग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली. यावेळी किमान बंद असलेल्या ठिकाणी मास्क बंधनकारक करा, अशी मागणी टास्क फोर्सकडून करण्यात आली आहे. तर राज्यातील कोरोना चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना देखील टास्क फोर्सकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, 1 एप्रिल रोजी महाराष्ट्रात मास्कसक्ती हटवण्यात आली होती. मात्र, अनेक राज्यात मास्क पुन्हा बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही पुन्हा मास्कसक्ती होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व राज्यातील मुख्यमंत्र्यांमध्ये कोरोनाबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार असून यात काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नवनीत राणा आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन?, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

लोकल प्रवाशांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय, आता लोकलमधून कोणी पडलं तर…

“मोटा भाई कोण छे, हे अमितभाईंनी 2014 मध्येच दाखवून दिलं”

सासूने नववधूच्या डोक्यातच घातला नारळ, पाहा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ

संजय राऊतांकडून जीवे मारण्याची धमकी, नवनीत राणांची पोलिसांत तक्रार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More