बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार आली बाजारात, ‘हे’ आहेत भन्नाट फिचर्स

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसात देशात इलेक्ट्रीक कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच आता टाटा मोटर्सने देशातील सर्व स्वस्त इलेक्ट्रीक कार लाँच केली आहे. काही दिवसांपूर्वीच टाटा मोटर्सने टिगॉर ईव्ही लाँच केली होती. आता पुन्हा काही अपडेट्ससह टाटाने ही गाडी भारतातही लाँच केली आहे.

टाटा मोटर्सने लाँच केलेली ही कार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार आहे. या कारचे सर्वात स्वस्त मॉडेल टाटा टिगॉर ईव्ही एक्सईची किंमत 11.99 लाख रुपये आहे. तर टाटा टिगॉर ईव्ही एक्सई एक्स एम मॉडेलची किंमत 12.49 लाख रुपये आहे. याशिवाय टाटा टिगॉर ईव्ही एक्स झेड प्लसची किंमत 12.99 लाख रुपये असणार आहे.

या कारला ईव्ही आयपी 67 रेटेड बॅटरी पॅक असणार आहे. ज्याची वॉरंटी 8 वर्षाची आहे. टिगॉर कारला फास्ट चार्जिंग वापरून एक तासात तर स्टॅडंर्ड होम चार्जर वापरून 8 तासात चार्ज करता येणार आहे. एका चार्जिंगमध्ये ही कार 300 किलोमीटरपर्यत चालवता येणार आहे.

गाडीला फिचर्समध्ये प्रोजेक्टर हेडलँप, डे-टाईम रनिंग लँप, एलईडी टेल लँप, ब्लॅक आउट विंग मिरर, ड्युअल फ्रंट एअरबॅग, रियर पार्किंग सेन्सर देण्यात येणार आहे. याशिवाय ईबीडी आणि ऐबीएस, डुयल टोन ब्लॅक आणि बेज स्किम, 7- इंच हरमन सोर्स टचस्क्रिन देण्यात आली आहे. एकंदरीतच जर तुम्ही इलेक्ट्रीक कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर टाटा मोटर्सची टिगॉर कार एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

थोडक्यात बातम्याा-

‘मला समन्स बजावला नाही’, ‘त्या’ चर्चांवर समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने दिली एसटी कर्मचाऱ्यांना भेट; केली ‘ही’ मोठी घोषणा

“समीर वानखेडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यांना तर…”

आगामी महापालिका निवडणुकीतील युतीबाबत जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य!

“शमी त्यांना माफ कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More