बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

या वर्षी 180 टक्क्यांनी वाढला टाटांचा ‘हा’ शेअर, झुनझुनवालांचीही आहे गुंतवणूक

नवी दिल्ली | गुंतवणूक ही एक सध्या आपल्याकडे सातत्यानं वाढत चाललेली गोष्ट आहे. गुंतवणुकीच्या (Investments) माध्यमातून आपण आपल्याकडील रक्कम एका विशिष्ट काळासाठी गुंतवत असतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑटो उद्योगाला उतरती कळा लागल्याचं पाहिल आहे. अशातही टाटा मोटर्सच्या शेअर्सनी (Tata motors) गुंतवणुकदारांना (Investors) फायद्यात ठेवलं आहे.

सध्या अनेक गुंतवणुकदार आंनदात आहेत. टाटा मोटर्सच्या शेअरचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. आतापर्यंत टाटा मोटर्सच्या शेअर्सचा भाव 180 टक्क्यांनी वाढला आहे. परिणामी या शेअर्सच्या माध्यमातून अनेकजण फायद्यात आहेत. या कंपनीच्या शेअर्सधारकांमध्ये प्रसिद्ध गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांचे सुद्धा 1.11 टक्के शेअर्स आहेत.

टाटा हा जगातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. टाटाच्या नवीन गाड्या सध्या बाजारात येणार आहेत. सध्या इलेक्ट्रीक वाहन उत्पादकांमध्ये टाटा मोटर्स सर्वात आघाडीवर आहेत. परिणामी त्यांच्या भागधारकांना सर्वात जास्त फायदा मिळत आहे. टाटा मोटर्सचा शेअर यावर्षी सर्वाधिक रिटर्न देणारा शेअर झाला आहे.

दरम्यान, सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांनचाच बोलबाला आहे. अशातही टाटा मोटर्स आपल्या भागधारकांसाठी फायद्याची ठरली आहे. येत्या काळात टाटा मोटर्सच्या शेअर्सची (Tata Motors Shares) किंमत आणखीन वाढण्याची चिन्ह आहेत.

थोडक्यात बातम्या 

“सदाभाऊ पाय पडले तर पडळकर नांगरे पाटलांना भिऊन…”, सदावर्तेंचे नवे गौप्यस्फोट

“…म्हणून मी एक मराठा लाख मराठा घोषणा दिली”, सदावर्तेंचं स्पष्टीकरण

केस कापण्यासाठी गेलेल्या लहान मुलीसोबत धक्कादायक प्रकार; एकाला अटक

भारतातील ‘या’ बड्या कंपनीत मेगाभरती, 1 लाख जागा भरणार

सोन्याच्या भावात काय चाललंय? आज ‘इतक्या’ रुपयांनी महागलं

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More