बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तौत्के चक्रीवादाळाचं संकट; NRDF च्या 10 टीम्स ‘या’ भागात तैनात

मुंबई | लक्षद्वीप आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. 15 तारखेच्या पहाटे हा पट्टा आणखी तीव्र होऊन त्याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनानं पूर्णपणे तयारी केली असून एनडीआरएफच्या टीम्स सुद्धा विविध ठिकाणी तैनात करण्यात येत आहेत.

तौत्के चक्रीवादाळात आपत्कालीनल परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि आपत्कालीन पूर्वतयारीसाठी एनडीआरएफच्या या 10 टीम्सपैकी 2 टीम गोव्यात, 2 टीम सिंधुदुर्गात, 2 टीम रत्नागिरीत, 4 टीम गुजरातमध्ये उद्यापासून सज्ज राहणार आहेत. तौत्के चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, एनडीआरएफचे वरिष्ठ अधिकारी आणि शहर आपत्कालीन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. जोरदार वारे आणि पाऊस पडणार असल्याचं लक्षात घेता मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबई मनपाच्या सर्व संबंधीत यंत्रणांना सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबईतील धोकादायक झाडांची छाटणी करण्यात येत आहे, समुद्र किनाऱ्याजवळील परिसरात पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेता वस्त्यांबाबत सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करणे, पाणी तुंबण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी पंप बसवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. विविध ठिकाणी पूरबचाव पथके तैनात करण्याचे निर्देश मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आले आहेत.

दरम्यान, हे वादळ 15 तारखेच्या पहाटे अधिक तीव्र होऊन त्यानंतरच्या 24 तासांमध्ये त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याती शक्यता आहे. हे वादळ आणखी तीव्र होऊन उत्तर-वायव्य दिशेनं गुजरात आणि त्याच्या बाजूच्या किनारपट्टीकडे जाण्याची शक्यता आहे. 15 ते 17 मे दरम्यान कोकण आणि गोवा येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

थोडक्यात बातम्या

सेकंडहँण्ड कारसाठी आई-बापानं पोटच्या मुलासोबत जे केलं ते ऐकून पोलिसही हादरले!

‘शरद पवार गेल्याची दुःखद बातमी आली अन्…’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचं पत्र चर्चेत

परवानगी नसातानाही ऑक्सिजनचा साठा करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई!

मोठी बातमी! मुंबईत पुढील दोन दिवस कोरोना लसीकरण बंद

किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यंत्रणांना केलं अलर्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More