मुंबई | पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-20 सीरीजसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा ही विराट कोहलीकडे असणार आहे. या सीरीजसाठी IPL मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सुर्यकुमार यादव, राहुल तेवतिया आणि इशान किशन या तिघांना संधी देण्यात आली आहे.
मुंबईकर सुर्यकुमार यादवला दिली संधी
इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी मुंबईच्या सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली आहे. सूर्यकुमारने आयपीएलच्या 13 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी केली होती. तसेच देशांतर्गत स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरीही केली होती. त्यामुळे त्याला ही संधी देण्यात आली आहे.
टी-20 मालिकेतील सर्व सामने अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या पाचही सामन्यांचे आयोजन 1 दिवसाच्या अंतराने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व सामन्यांना संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
दरम्यान, टीम इंडियाने आतापर्यंत सलग 5 वेळा टी-20 मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. यामुळे इंग्लंड विरुद्धची ही मालिका जिंकून टी-20 मालिका विजयाचा षटकार मारण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे.
टीम इंडिया –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
टी-20 मालिकेचे वेळापत्रक –
12 मार्च – पहिली टी-20 मॅच मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद संध्याकाळी 7 वाजता
14 मार्च – दुसरी टी-20 मॅच मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद संध्याकाळी 7 वाजता
16 मार्च – तिसरी टी-20 मॅच मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद संध्याकाळी 7 वाजता
18 मार्च – चौथी टी-20 मॅच मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद संध्याकाळी 7 वाजता
20 मार्च – पाचवी टी-20 मॅच मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद संध्याकाळी 7 वाजता
थोडक्यात बातम्या –
गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण वाढले, जाणून घ्या ताजी आकडेवारी!
कार्यालयीन वेळासंदर्भात मुख्यमंत्र्यांची थेट पंतप्रधानांकडे मागणी
मास्टरच्या गाण्यावर खेळाडू थिरकले, सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय ‘हा’ व्हिडीओ
सहा वर्षे सत्तेत असूनही चुका दुरुस्त करता आल्या नाहीत का?- शरद पवार
जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणं महत्वाचं- रिंकू राजगुरू