बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘धीर तरी कसा देऊ’; चिपळूणच्या पाहणी दौऱ्यावर असताना उर्मिला मातोंडकरांना पैसे देताना अश्रू अनावर

रत्नागिरी | मुसळधार पावसामुळे राज्यातील कोकण विभागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पावसाचं पाण्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. पावसाचं पाणी तेथील लोकांच्या घरात आणि दुकानात शिरल्याने लोकांचं नुकसान झालं आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशातच शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी चिपळूणमध्ये जात पाहणी केली.

सर्व पाहणी केल्यावर त्यांना अक्षरक्ष: रडू कोसळलं. ज्या कुटूंबापर्यंत कोणी पोहोचलं त्या कुटुंबाची भेट घेत त्यांनी त्या कुटुंबाला रोख रक्कम देत मदत केली. सध्याची स्थिती पाहता कोणाचाही धीर सुटेल अशी अवस्था झाली आहे. हे घर आतमध्ये आहे, कशी मदत पोहोचणार माहित नाही. परमेश्वराने त्यांना वाचवलं आहे तर नक्की पुढची मदत होईल, असं मातोंडकर म्हणाल्या.

मी नेता नाही पण आश्वासन दिलं असून ते मी माझ्या परीन पुर्ण करेल. अजून काय करू?, असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांना अश्रू अनावर झाले. ही घटना घडली तेव्हा आपण कोलकातामध्ये असल्याचं उर्मिला मातोंंडकर म्हणाल्या.

दरम्यान, महाप्रलयाची स्थिती पाहून मी दु:खी झाले आणि त्यावेळी ठरवलं की कोकणवासियांना मदत करायची. कोणी तरी पुढाकार घेत मदत करणं गरजेचं होतं आणि तिच मदत घेऊन मी आल्याचं मातोंडकर यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचे लोक देखील गांभीर्योने घेत नसावेत”

बाबो! प्रशिक्षकाने मॅच अगोदर महिला खेळाडूच्या लावली कानशिलात; टोकियो ऑलिम्पिकमधील व्हिडीओ व्हायरल

“भाजपवाले मत मागायला येतील दोन पायांवर पण जातील चौघांच्या खांद्यावर”

राज कुंद्राने लॅाकडाऊनमध्ये फक्त पाचच महिन्यात कमावले ‘एवढे’ कोटी रुपये!

“भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More