मुंबई | महाराष्ट्रात आढळणाऱ्या पालींच्या प्रजातींमध्ये दोन नव्या प्रजातींची भर पडली आहे. सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतून या नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे, इशान अगरवाल आणि अक्षय खांडेकर यांनी हा शोध लावला आहे.
कोयनेच्या खोऱ्यातून सापडलेल्या पालीच्या प्रजातीला ‘निपास्पिस कोयनाएन्सिस’ आणि आंबाघाटामधून सापडलेल्या प्रजातीला ‘निमास्पिस आंबा’ अशी नावं देण्यात आली आहेत.
तेजस ठाकरे, इशान अगरवाल आणि अक्षय खांडेकर या तिघांची टीम गेल्या वर्षी पावसाळ्यात संशोधनासाठी गेली होती. यावेळी त्यांनी पालींचे सॅम्पल गोळा करून त्यांच्या डीएनएचा अभ्यास केला.
दरम्यान, पालींच्या या नव्या प्रजातींच्या संदर्भातील संशोधन ‘झूटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झालं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही- शरद पवार
-पटत नसलं तरी समर्थनार्थ बोलावं लागतं- नारायण राणे
-आबा माणूस म्हणून खूप मोठे होते… शेतकऱ्यांचा त्यांना कळवळा होता- राजू शेट्टी
-महाराष्ट्रात राणेंच्या कर्तृत्वाला नक्की संधी मिळेल; नितीन गडकरींना विश्वास
-अक्षय कुमार पूरग्रस्तांना म्हणतो…. ‘संकटांशी लढण्याची शिकवण शिवाजी महाराजांकडून मिळालीये’
Comments are closed.