बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

औषधांची ड्रोनद्वारे होम डिलव्हरी करणारं देशातील ठरणार ‘हे’ पहिले राज्य!

नवी दिल्ली | देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत जगभरातून सर्वात जास्त लसीकरण भारतात झालं आहे. भारतातील जवळपास 65 कोटी पेक्षा जास्त नागरिकांनी लस घेतल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. अशातच भारतात पहिल्यांदाच ड्रोनद्वारे लस आणि औषधांचे वितरण करण्याची परवानगी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली आहे.

तेलंगणा सरकार शनिवारपासून ‘मेडिसिन फ्रॉम द स्काय’ प्रकल्प राबवणार आहे. या प्रकल्पांतर्गत औषधांचं आणि लसीचं वितरण पहिल्यांदाच ड्रोनद्वारे केलं जाणार आहे. औषधांची होम डिलव्हरी करणारे देशातील तेलंगणा पहिलं राज्य ठरलं आहे. तसेच हा प्रकल्प वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, नीती आयोग आणि हेल्थनेट ग्लोबल यांच्या संयुक्त भागीदारीने राबवण्यात येत आहे.

विमान वाहतूक मंत्रालयाने बियॉन्ड व्हिज्युअल लाईन ऑफ साईट ड्रोन वापरण्यासाठी मंजूरी दिली आहे. त्यानंतर शनिवारी तेलंगणा राज्यातील विकाराबाद जिल्ह्यातील पोलीस परेड मैदानावरून हा प्रकल्प सुरू होणार आहे. त्यानंतर देशातील औषधांचं वितरण करणारं ब्ल्युडार्ट मेड एक्सप्रेस कन्सोर्टियम, हेलिकॉप्टर कन्सोर्टियम आणि कर्फिस्ली कन्सोर्टियम हे आठ पैकी तीन संघ विकाराबादला पोहचले आहेत.

दरम्यान, लांब पल्ल्याच्या आणि पेलोडवर ड्रोनच्या क्षमतेच्या मुल्यांकनासाठी अधिकारी चाचणी करत असल्याची संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे हवाईद्वारे औषध वितरण करणारे तेलंगणा हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार; अण्णा हजारेंचा आंदोलनाचा इशारा

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमाला आले तर…’; नारायण राणेंचा ‘त्या’ वक्तव्यावरून यु-टर्न!

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आगीतून फुफाट्यात! विश्वचषकाच्या तोंडावर राशिद खाननं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

रविंद्र जडेजाच्या घरी रंगला ‘राजकीय सामना’; नणंद भावजय आमने- सामने

‘जर ‘या’ नियमांचा भंग झाला तर कलम 144 लागू करणार’; विश्वास नांगरे पाटलांचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More