बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टेनिस विश्वातील मोठी घटना; विम्ब्लडनचा ‘बादशाह’ रॉजर फेडररचा मानहाणीकारक पराभव

मुंबई | रॉजर फेडररला विम्ब्लडनचा बादशाह समजलं जातं. मोठमोठे दिग्गज खेळाडू राॅजर फेडरर समोर गुढघे टेकवतात. रॉजर फेडरर आतापर्यंत 8 वेळा विश्वविजेता राहिला आहे. याच रॉजर फेडररला मोठा धक्का बसला आहे. टेनिस विश्वात कधी चर्चेच नसलेल्या अशा खेळाडूने विम्ब्लडनचा बादशहाला हरवलं आहे. या सामन्यानंतर क्रीडा विश्वात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना पोलंडच्या हुबर्ट हुर्काझ आणि रॉजर फेडरर यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना फेडरर सहज जिंकेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण हुबर्ट हुर्काझने विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत सनसनाटी निकाल लावत रॉजर फेडररचा 6-3, 7-6 आणि 6-0 असा दारूण पराभव केला. त्याने सलग तीन सेटमध्ये फेडररचा पराभव केल्यानं सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पहिला सेट 6-3 च्या फरकाने हुबर्ट हुर्काझने आपल्या नावी केला. त्यानंतर फेडरर पुर्नआगमन करत पुढील दोन्ही सेट जिंकेल असं सर्वांनाच वाटत होतं. अपेक्षेप्रमाणे फेडररने चांगला खेळ दाखवला. पण हुर्काझने देखील या सेटमध्ये आपली बाजू कमी पडू दिली नाही. त्याने देखील फेडररला जोरदार फटके मारले. हा सेट अखेर 6-6 वर आला. आता शेवटच्या सर्विसवर या सेटचा निकाल ठरणार होता. पण अखेर हुर्काझने हा अखेरची डाव जिंकत हा सेट देखील जिंकला.

दरम्यान, आता फेडररची करो या मरो अशी स्थिती होती. या सेट हरला तर सामना हारणार हे निश्चित होतं. पण अखेरच्या सेटमध्ये फेडररला काही खास कामगिरी करता आली नाही. या सेटमध्ये त्याला एकही अंक मिळवता आला नाही. हुबर्ट हुर्काझने 6-0 असा हा सेट जिंकला आणि अखेर विश्वविजेत्या राॅजर फेडररचा पराभव केला. त्याच्या या कामगिरीनंतर हुबर्ट हुर्काझचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर शिवसेनेचं आव्हान, म्हणाले…

‘बिघडलंय तर इंजिन आणि बदलले डबे’; मंत्रीमंडळाच्या विस्तारावर महाविकास आघाडीची टीका

‘आता कुणाला काय सीडी लावायची, ती लावावी’; भाजपचं थेट खडसेंना आव्हान

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचं निधन!

एकनाथ खडसेंची प्रकृती बिघडली; आज होणारी पत्रकार परिषद रद्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More