Top News महाराष्ट्र मुंबई

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून 17 नंबरचा अर्ज भरता येणार!

मुंबई | राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावी परीक्षेचा 17 नंबरचा नावनोंदणी अर्ज भरण्यास 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थी नियमित शुल्कासह 25 जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज ऑनलाइनच भरावेत. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळ सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत.

दहावीचे विद्यार्थी https://form17.mh-ssc.ac.in या तर बारावीचे विद्यार्थी https://form17.mh-hsc.ac.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, नोंदणी शुल्क व इतर कागदपत्रे संपर्प पेंद्रात जमा करण्यासाठी 12 ते 27 जानेवारीपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप पूर्ण ताकदीनिशी लढणार- चंद्रकांत पाटील

कोरेगाव भीमाला जाणारच, प्रसंगी न्यायालयात जाऊ- चंद्रशेखर आझाद

समुद्रातील कार जेसीबीनं बाहेर काढली; वाचा नेमकं काय घडलं होतं

‘….तोपर्यंत नव्या वर्षांचं सेलिब्रेशन नाही’; आंदोलक शेतकरी आक्रमक

पीडित मुलीला न्याय देणार का पवार साहेब?’; मेहबूब शेख यांच्या प्रकरणावरून राणेंचा थेट पवारांना सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या