देश

जैश उल हिंद दहशतवादी संघटनेनं घेतली दिल्ली स्फोटाची जबाबदारी!

Photo Credit- ANI

नवी दिल्ली | दिल्लीत इस्त्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाची जबाबदारी जैश ए उल हिंद या दहशतवादी संघटनेनं घेतलीये.

टेलिग्राम चॅटमधून ही माहिती पुढे आली असून, तपास यंत्रणांकडून त्याची पडताळण केली जात आहे. या आधी एक चिठ्ठी यंत्रणांना घटनास्थळी सापडली होती. त्यातून हा दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळाले होते.

या चॅटमध्ये दहशतवादी संघटना हल्ल्यावर अभिमान व्यक्त करताना दिसत आहे. मात्र यंत्रणांकडून जैश ए उल हिंदकडून करण्यात आलेल्या दाव्याची पडताळणी केली जात आहे.

दिल्ली पोलीसांच्या स्पेशल टीमनं इस्त्रायली दूतावासाजवळचे जवळपास सर्व महत्त्वाचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतलं आहे. त्यात तीन ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज स्फोट घडवणाऱ्यांपर्यंत नेऊ शकतात, अशी आशा तपास यंत्रणा एनआयएला आहे. एका कॅबमधून दोघे उतरले, त्या कॅबनेच दोघा संशयितांना घटनास्थळाजवळ सोडल्याचं सीसीटीव्हीत उघड झालं आहे. स्पेशल टीमनं कॅब ड्रायव्हरशी संपर्क साधला आहे. संशयितांचे स्केच बनवण्यात आलेत. त्यावरुन त्यांचा शोध सुरु आहे.

थोडक्यात बातम्या-

….तर म्हणाल अजित पवार काय भंगार बोलत होता- अजित पवार

सुधारणांवरुन वाद नको, पण व्यवस्था कमकुवत होऊ नये- शरद पवार

शिवसेना सगळं बटण दाबून करते- नारायण राणे

धक्कादायक…! सुशांतसिंग राजपूतच्या भावाला भर चौकात गोळ्या घातल्या!

शेतकऱ्यांनो, मी तुमच्यापासून फक्त एक कॉल दूर- नरेंद्र मोदी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या