बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावं, प्रमाणपत्र रद्द

मुंबई | पुणे सायबर सेल पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी टीईटी(TET) परिक्षेचा गैरव्यवहार उघडकीस आणला होता.  या प्रकरणात तपास केला असता, 2019-20 च्या टीईटी परिक्षेत एकून 16 हजार 592 विद्यार्थ्यांना पात्र केल्याचे दिसून आले होते. प्रत्यक्षात मात्र यातील सात हजार 800 विद्यार्थी अपात्र असताना त्यांना निकालात पात्र ठरवल्याचे दिसून आले. त्यानंतर या सात हजार 800  विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे पोलीस आणि शिक्षण विभागाकडून तपासण्यात आली.

आता या परिक्षेचा घोटाळा आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar)यांच्यापर्यंत पोहोचला आहे. परिक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली होती. त्या यादीतील काही अपात्र विद्यार्थांनी पात्र होण्यासाठी सुपे यांनी पैसे दिले हाते, पण सुपे यांनी या विद्यार्थ्यांना पात्र असल्याचे प्रमाणपत्र दिले नव्हते. आता या यादीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन मुली हिना आणि उजमा यांची नावे असल्याचे समोर आले आहे. आता या दोघींचीही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत.

सत्तार यांच्या दोन्ही मुली हिना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका 2020 मधील टीईटी परिक्षेत अपात्र ठरल्या आहेत. या दोघींनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था आहेत, आणि याच संस्थेत त्यांच्या या दोन्ही मुली सेवारत असल्याचे सांगण्यात आले आहेत.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर स्पष्टीकरण देताना सत्तार म्हणाले, की आमच्या बदनामीचा प्रयत्न केला जातोय. बदनामीचा प्रयत्न करणाऱ्यांना फाशीवर लटकावा. तसेच मला मंत्री पदाची काळजी नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?

पुणेरी पाटी पाहताच अमृता फडणवीसांना आठवले एकनाथ शिंदे, म्हणाल्या…

“…तर हे सरकारही जाऊ शकतं, तयारीला लागा”

‘बिग बॉस मराठी 4’ महेश मांजरेकर नाहीतर ‘हा’ अभिनेता होस्ट करणार?

अमित ठाकरेंची भाऊ आदित्य ठाकरेंवर टीका, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More