Top News

अवघ्या 48 तासांच्या आत ‘या’ नेत्यांच्या खात्यात अदलाबदल

मुंबई | ठाकरे सरकारचं गुरुवारी तात्पुरतं खातेवाटप झालं. मात्र, 48 तासांच्या आता खातेवाटपात बदल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते आता जयंत पाटील यांना देण्यात आले आहे. तर अन्न आणि नागरी पुरवढा, अल्पसंख्यांक विकास आणि कल्याण ही खाती छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहेत.

खातेबदलाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. मात्र अदलाबदल झालेली खाते भुजबळ आणि पाटील यांच्याकडे तात्पुरती राहणार आहेत की कायमस्वरुपी हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

दरम्यान, ठाकरे सरकारमध्ये सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर गुरुवारी यांच्यात खातेवाटप करण्यात आली आहे. मात्र ही खातेवाटप तात्पुरती असल्याचं समजत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या