मुंबई | महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे 36 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. मात्र, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाजप बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.
भाजपचे नेते महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाहीत अशा चर्चा होत आहे. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून एका मोठ्या वर्गाला या कर्जमाफीचा काहीही लाभ होणार नाही, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन भाजप शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणार असल्याचं बोललं जातंय.
ठाकरे सरकारचा आज, सोमवारी दुपारी एक वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यामुळे या विस्ताराकडे लक्ष्य लागलं आहे.
दरम्यान, राज्याच्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, शिवसेनेनं मार्ग बदलत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गट्टी केली. त्यामुळे भाजप या नव्या सरकारवर नाराज आहे.
महत्वाच्या बातम्या-
अजित, संधीचं सोनं करा; मंत्रिमंडळ विस्ताराआधी अजित पवार शरद पवारांच्या भेटीला – https://t.co/Kr4uvxWTVx @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) December 30, 2019
ठरलं! आदित्य ठाकरे घेणार मंत्रिपदाची शपथ https://t.co/oVMx5ZXGRJ @AUThackeray @ShivSena #म
— थोडक्यात (@thodkyaat) December 30, 2019
एकनिष्ठेचं फळ! मी जन्मभर तुमचा ऋणी राहिन- जितेंद्र आव्हाड https://t.co/DBaia5cmvV @Awhadspeaks @NCPspeaks @PawarSpeaks #म
— थोडक्यात (@thodkyaat) December 30, 2019
Comments are closed.