Top News महाराष्ट्र मुंबई

ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन- अतुल भातखळकर

मुंबई | 16 जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं कोणत्या राज्यानं आतापर्यंत किती जणांना लस दिली याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हा आठव्या क्रमांकावर आहे. यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन, असं म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

भातखळकर म्हणाले की, “कोविडची लस तयार आहे, परंतु महाराष्ट्र सरकारचे हलेडुले सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची मोहीम देशभरात सुरू असून या यादीत ठाकरे सरकारचा क्रमांक 8 वा आहे. फक्त टक्केवारीत नंबर वन.”

तसंच, अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केंद्र सरकारची एक यादी जाहीर केली आहे. त्यात 19 जानेवारी 2021 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देशभरातील कोणत्या राज्यात किती लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे याची माहिती यात देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘शेतकरी आंदोलनात खलिस्तानी एके-47 घेऊन फिरत आहेत’; ‘या’ भाजप खासदाराचा दावा

भाजपने बदललं ड्रॅगन फ्रूटचं नाव, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलं ‘हे’ नवीन नाव!

“भारतीयांनो खरा संघ येतोय तुम्हाला तुमच्याच घरात पराभूत करायला, सतर्क रहा”

‘माझे वीजबिल, मलाच झटका…; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची सरकारवर टीका

गांजाचा वापर करुन कोरोना रुग्णांना वाचवता येऊ शकतं; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या