बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला ठाकरे सरकारकडून ब्रेक?

मुंबई | मराठवाड्याला मुबलक पाणी मिळावं आणि मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना आखली होती. मात्र याच योजनेला ठाकरे सरकारने ब्रेक लावण्याचे संकेत दिले आहेत.

मराठवाडा वॉटर ग्रीड या फडणवीसांच्या योजनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या योजनेवर तज्ञांकडून सल्ला घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना बारगळण्याची शक्यता आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीड ही तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारची महत्वकांक्षी योजना होती. या योजनेचं काम एका खाजगी कंपनीला देण्यात आलं होतं. या योजनेसाठी फडणवीसांनी 10 हजार कोटीदेखील दिले होते.

फडणवीस सरकारने आणलेल्या योजना रद्द करण्याचा सपाटा ठाकरे सरकारने लावला असल्याचं दिसत आहे. आता वाॅटर ग्रीड योजनेलाही ब्रेक लागण्याचे संकेत असल्याने भाजप याला जोरदार विरोध करण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“सगळे निर्णय अजित पवार घेतायत अन् मुख्यमंत्री गोट्या खेळतायत”

पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय?; प्रेमी युगलाला मारहाण करत तरूणीचा विनयभंग

महत्वाच्या बातम्या- 

प्रेमी युगलाला मारहाण करणारे सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात

निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांच्या फाशीला स्थगिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More