बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाना पटोलेंचं नशीब चमकलं!, ठाकरे सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या फेरबदलांचा फायदा काँग्रेस नेत्यांना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच काँग्रेसचे नेते दिल्लीला जाणार असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Maharashtra Congress president Nana Patole ) यांना मंत्रिपद देण्याबाबत चर्चा करणार आहेत. याशिवाय इतरही अनेक महत्त्वाचे बदल मंत्रिमंडळात केले जाऊ शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पटोले यांच्याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे ( Congress Leader Praniti Shinde ) यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन त्याऐवजी नाना पटोले यांना संधी दिली जाऊ शकते. तर एका राज्यमंत्रिपदाबाबतही असेच काहीसे बदल करण्यात येऊ शकतात. आमदार प्रणिती शिंदे यांना राज्यमंत्रिपद देण्याचा विचार पक्षाकडून चालू आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Cabinet Minister Nitin Raut) यांच्या कामावर पक्ष नाराज असून त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी संधी दिली जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आता खरंच नितीन राऊत यांचं मंत्रfपद जाणार का? आणि त्याऐवजी कोणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. काँग्रेस नेते दिल्ली दौऱ्यावर जाऊन यासंबधित निर्णय घेणार आहेत.

मंत्रिमंडळातील फेरबदलाबरोबरच राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाबद्दलही लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. दिल्ली दौऱ्यात या बाबतही चर्चा होऊ शकते. विधानसभेचं अध्यक्षपद अजूनही रिक्त आहे. त्यामुळे लवकरच याबाबत विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे जर आता ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला तर याचा काँग्रेसला (Congress) मोठा फायदा होऊ शकतो.

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ; ‘त्या’ चॅटवरुन क्रांती रेडकरची पोलिसात धाव

लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर, प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

इंधन दर स्वस्त करण्यासाठी ‘हा’ आहे मोदी सरकारचा ‘मास्टर प्लान’

राज्य सरकारने दिलेली ‘ही’ ऑफर एसटी कर्मचारी मान्य करणार का?

…म्हणून ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमनं मागितली नारायण राणेंची माफी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More