Top News

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळानं घेतले ‘हे’ दोन महत्त्वपुर्ण निर्णय!

मुंबई | आज राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे सरकारने फडणवीसांच्या कार्यकाळातील घेतलेले दोन महत्त्वपुर्ण निर्णय रद्द करत इतरही काही निर्णय घेतले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांचा मतदान करण्याचा अधिकार ठाकरे सरकारने काढून घेतला आहे. ही पद्धत खर्चिक आणि अव्यहार्य आहे. त्यामुळे ही पद्धत आम्ही रद्द करत आहोत, असं मुख्यमंत्री ठाकरे सरकारने सांगितलं आहे.

जिल्ह्यातून आणि गावातून पर्यायी नेतृत्व निर्माण करण्याच्या फडणवीसांच्या संकल्पनेच्या मुळावर घाव घातला आहे. नवीन सरकारनं थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रिया रद्द करणार असल्याचं कळतय.

दरम्यान, मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजूरी दिली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. तसंच शिवभोजन थाळीसाठी तूर्तास आधारकार्डची गरज नाही, असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“…म्हणून मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंची नागपुरात बदली केली असावी”

“आमच्याकडे सर्टीफिकेट मागण्यापूर्वी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या