बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ वृत्तावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण; महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लसीकरण मोहीमेला वेग आला आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस खरेदी केली जात आहे. त्याचबरोबर आता 1 मे पासून 18 वर्षाच्या पुढील नागरिकांना देखील लस देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता. पण लसीकरण मोहिम राबवण्यासाठी लसीचा तुडवडा जाणवू लागला आहे. यातच केंद्र सरकारने सिरमच्या 25 मे पर्यंतच्या सर्व लसी आधीच बुक केल्या आहेत, असं वृत्त समोर आलं होतं. आता केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

लस उत्पादक कंपनीसोबत केंद्र सरकारचा करार झाला असून 25 मे पर्यंत राज्य सरकार लस खरेदी करु शकणार नाही, अशी माहिती समोर आली होती. मात्र आता केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती करणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केंद्र सरकारला 25 मे 2021 पर्यंत लसींचे सर्व डोस देण्याचा करार केला आहे. त्यामुळे राज्य सरकारांना सीरमकडून लस खरेदी करता येणार नाही, असं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. मात्र हे वृत्त निराधार आहे. असा कोणताही करार झालेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

संपूर्ण लसींचे डोस खरेदी करण्याच्या संदर्भात असा कुठलाही करार झालेला नसल्यानं राज्य सरकार सीरमकडून लस खरेदी करु शकतात. नियमानुसार राज्य सरकार हे लसींचे डोस खरेदी करु शकतात, असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. यामुळे आता महाराष्ट्र सरकार सुद्धा थेट सीरम इन्स्टिट्यूटकडून लस खरेदी करु शकणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांच्यात गुरूवारी सविस्तर चर्चा झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला येत्या काही काळात 20 कोटी लस मिळण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…तर दोन खाशील’; ऑक्सीजन न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीला केंद्रीय मंत्र्यांची धमकी

बंगळुरुचा विजयी चौकार, राजस्थानवर 10 विकेट्सने मिळवला विजय

धक्कादायक! बेड मिळाला नाही म्हणून झाडाखाली झोपले अन् पत्नीसमोर सोडला प्राण

आजपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची संपूर्ण नियमावली; वाचा एका क्लिकवर…

आरे भावा तुच जिंकलाय टॉस! टॉसदरम्यान गोंधळला विराट कोहली, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More