बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेराल तेच उगवेल! “विराटने त्याच्यासोबत असंच केलं होतं”; कोहली सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघातील कथित वाद आता प्रकर्षाने समोर येताना दिसत आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat kohli) आणि भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात कथित वाद देखील समोर आला होता. अशातच आता विराट कोहली आणि बीसीसीआयमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं सांगितलं जातंय.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेतील दाव्यामध्ये फरक आहे. अशातच आता दादा विरूद्ध किंग कोहली वादाला तोंड फुटलं आहे. आता विराट कोहली सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी पेराल तेच उगवेल, तू ही अनिल कुंबळे (Anil Kumble) सोबत असचं केलं होतं, अशी टीका कोहलीवर होताना दिसत आहे. त्यामुळे कोहली आणि कुंबळे यांच्यातील कथित वादाला पुन्हा तोंड फुटलं आहे.

2016-17 दरम्यान कुंबळे हे एक वर्ष भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यावेळी सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने शास्त्रींच्या जागी कुंबळेंची नियुक्ती केली. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीसोबतच्या मतभेद असल्यामुळे कुंबळेने राजीनामा दिला होता.

दरम्यान, अनिल कुंबळेसाठी संघातील शिस्त ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. यामुळेच तो कोहलीसोबत जुळवून घेता आलं नाही. दोघांनी 6 महिने एकमेकांशी बोलणेही केले नाही. मात्र, कर्णधार विराटने अनिल कुंबळेसोबत मतभेद असल्याच्या वृत्ताचे खंडन देखील केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता, पण…”

लिटल मास्टर म्हणतात, “नेमकं काय झालंय हे फक्त ‘तो’ व्यक्ती खरं सांगू शकतो”

“तो दिवस मी विसरू शकत नाही, मी शाळेत होतो तेव्हा…”, भर कार्यक्रमात राहुल गांधी भावूक

‘मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्षे होणार’, केंद्र सरकारच्या हालचालींना वेग

Mr.360 वादाच्या भोवऱ्यात! ‘या’ प्रकरणात आढळला दोषी, कारवाईची शक्यता

मुहूर्त ठरला! 10वी आणि 12वी परीक्षेच्या तारखा जाहीर, यंदा ऑफलाईन परीक्षा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More