बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेला रामराम ठोकत ‘या’ बड्या नेत्याची दोन वर्षांतच काँग्रेसमध्ये घरवापसी

पालघर | महाविकास आघाडीतील नेत्यानं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्याचं उदाहरण पुन्हा समोर आलं आहे. वसईतील विजय पाटील या बड्या नेत्यानं शिवसेनेला रामराम ठोकत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात विजय पाटील यांनी गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवली होती.

विजय पाटील यांची दोन वर्षांतच काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. विजय पाटील यांनी याआधी काँग्रेसचे राज्य सचिवपद भूषवले आहे. मात्र 2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, काल शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थित विजय पाटलांनी काल पक्षप्रवेश केला. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सप्टेंबर 2019 मध्ये पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवबंधन हाती बांधले होते.

विजय पाटील यांच्या घरवापसीने वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे, तर काँग्रेसला बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. महापालिका निवडणुकांना दोन्ही पक्ष एकत्र सामोरे जाणार की स्वतंत्र, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. मात्र, वसईत  असलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे विजय पाटील यांना मोठं पाठबळ आहे.

दरम्यान, विजय पाटील हे वसईतील प्रभावी राजकीय नेते आहेत. आग्री, वाढवळ, ख्रिश्चन समुदायांचा त्यांच्या पाठीशी चांगला पाठिंबा असल्याचंही बोललं जातं. पाटील हे वसईतील उद्योजक आहेत. त्यांना स्वच्छ प्रतिमेचा राजकीय चेहरा असंही बोललं जातं.

थोडक्यात बातम्या

नियतीने किती निष्ठूर व्हावं? मुलीनं काढलं चित्र, मात्र पहायला आता बापच राहिला नाही!

पुणे हादरलं! चक्क गुंडाने केली पोलीस हवालदाराची हत्या

“घरावर दरोडा घालून माझ्या 2 गाड्या चोरल्या”; परमबीर सिंह आणि प्रदीप शर्मावर गंभीर आरोप

केंद्र सरकारची मोठी घोषणा; राज्यातील कोरोना योद्ध्यांना पुन्हा मिळणार 50 लाखांचं विमा संरक्षण

मराठा आरक्षणाच्या निकालाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More